ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांचाआज मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मुख्य शाखेत सत्कार केला गेला. खासदार महोदयांनी ही ग्रंथालयाचे या प्रसंगी आभार व्यक्त करत त्यांची वाचनाप्रती असणारी ओढ याबाबत जुन्या आठवणी ताज्या केल्या. आजच्या काळातही सर्व वयोगटातील वाचक वर्गासाठी अनेक उपक्रम राबविणाऱ्या आपल्या या संस्थेचे त्यांनी खूप कौतुक केले. तसेच आगामी काळात विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या तरुण वर्गासाठी उपक्रम राबविणे तसेच डिजिटल पद्धतीने वाचक वर्गासाठी काहीतरी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात संस्थेला मार्गदर्शन करू असे आश्वासन दिले.
