वाक्याच्या वजनाला न्याय देणे महत्त्वाचे आहे : वैभव जोशी

ठाणे :  कोकण मराठी साहित्य परिषद आणि  टॅग आयोजित ‘काव्य पे चर्चा’ या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांच्याशी दिग्दर्शक विजू माने यांनी गडकरी रंगायतन येथे संवाद साधला.

हल्ली काय लिहीले यापेक्षा कोणी लिहीले याला जास्त दाद दिली जाते. नविन लिहिलेल लोकांना ऐकवायला पाहिजे हे सांगताना जोशी यांनी पुढच्या वर्षी वारी ही कविता सादर करुन चर्चेला सुरूवात केली. त्यांनी पहिली कविता कशी सुचली याचा प्रवास उलगडताना जोशी म्हणाले की, छोट्या छोट्या गावांतून ज्यावेळी मुले शहरात येतात त्यावेळी मराठी भाषेचेच वर्गीकरण केले जाते त्यामुळे त्यांना संभाषणाची आणि अभिव्यक्तीची भिती वाटू लागते. त्यामुळे ही मुले कोमेजून जातात. असाच सामाजिक परिस्थीतीमुळे दबले गेल्यामुळे मी सेंटर स्पेस घेण्याचा प्रयत्न करत होतो.

कविता सुचते कशी? या माने यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जोशी म्हणाले की, कविता सुचते कशी याला खरंतर उत्तर नसते. कविता स्वयंभू येते. शून्यातून उगवणारी गोष्ट असते. जादूगार आणि कवीत एकच फरक असतो. जादूगाराला जादू करताना त्यातून काय बाहेर येणार आहे हे माहित असते पण कवीला कोणती कविता सुचेल हे माहीत नसते. जादूगाराची जादू बाहेर येते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचे भाव असतात पण जेव्हा कवीकडून कविता तयार होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समोर बसलेल्या प्रेक्षकांसारखेच भाव असतात. या जगात अखंड काव्य आहे, लिहीणारा वर बसलेला परमेश्वर आहे. त्याला लिहायचे होते म्हणून तो वेगवेगळ्या देहातून लिहीतोय असे उद्गार त्यांनी काढले.

Leave a Comment

× How can I help you?