जो विश्वासघात करतो तो हिंदुत्ववादी कधीच होऊ शकत नाही – शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

यावेळी शंकराचार्य म्हणाले की आपण सगळे हिंदू आणि सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत. पुण्य पापाची भावना आपल्याकडे सांगितली आहे . सगळ्यात मोठा घात हा विश्वासघात असतो. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झालेला आहे , याबाबतची पीडा अनेकांना आहे. त्यांच्या निमंत्रणानंतर मी मातोश्रीवर आलो त्यांनी माझं स्वागत केलं. मी त्यांना सांगितलं जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर खुर्चीवर परत बसत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातील दुःख कमी होणार नाही. कोणाचं हिंदूत्व खरं हे समजून घ्यावे लागेल. पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो. जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू असतो. जनतेचा सुद्धा अपमान करण्यात आलेला आहे, जनमताचा अनादर करणे हे चुकीचे आहे. नरेंद्र मोदी माझे दुश्मन थोडी आहेत. त्यांच्या हिताबद्दल मी बोलत असतो. त्यांच्या चांगल्यासाठीच आम्ही बोलत असतो. चूक झाली तर आम्ही त्यांना थेट चूक झाली म्हणून सांगतो.

 

 

Leave a Comment

× How can I help you?