ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यक्षेत्रात पार पडला वृक्षारोपण कार्यक्रम

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या अभियानात सोमवारी सकाळी ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समितींमध्ये महापालिकेच्या सर्व विभागांच्या मार्फत वृक्षारोपण करण्यात आले. त्यात उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, उपनगर अभियंता,कार्यकारी अभियंता आदी प्रमुख अधिकारी सहभागी झाले. त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचीही प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र नगर मैदान, कावेसर मलनि:सारण केंद्र, कोलशेत कंपोस्ट प्लांट, वागळे जलकुंभ परिसर, रायलादेवी तलाव, साकेत पोलीस मैदान, वागळे खुला रंगमंच, डायघर, दिवा, मुंब्रा मलनि:सारण केंद्र, दादोजी कोंडदेव मैदान, घोलाईनगर आदी ठिकाणी स्थानिक अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने सुमारे ३ हजार झाडे लावण्यात आल्याची माहिती वृक्ष अधिकारी केदार पाटील यांनी दिली.

ही रोपे ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून उपलब्ध करून देण्यात आली. त्यात, ताम्हण, बकुळ, जांभूळ, कडुनिंब, कांचन, बेहडा, महोगनी, सप्तपर्णी आगी देशी प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे. यासोबतच, भिवंडीतील आतकोली येथे क्षेपणभूमीवरही वृक्षारोपण करण्यात आले. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात ५०० झाडे लावण्याचा ठाणे महापालिकेचा संकल्प असून आठवडाभरात टप्प्याटप्प्याने ही झाडे लावण्यात येणार आहेत.

गेल्या आठवड्यात, ठाणे महापालिका क्षेत्रातील सुमारे ११० गृहनिर्माण सोसायट्यांच्या सहकार्याने विविध ठिकाणी २२०० झाडे लावण्यात आली होती. तर, कृषी दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या धर्मवीर आनंद दिघे उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले होते. या परिसरात एकूण ३०० झाडे लावण्यात आली. त्याच दिवशी, ठाणे महापालिकेच्या शाळा आणि खाजगी शाळा यांच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने शाळांच्या परिरसात छोटेखानी वृक्षदिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालये यांच्या सुमारे २५०० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपआपल्या परिसरामध्ये वृक्ष दिंडी आणि ५४०० झाडे लावण्यात आली.

Leave a Comment

× How can I help you?