लक्षावधी अंधांना नेत्रदृष्टी देणा-या पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांची माय काळाच्या पडद्याआड.! ( १६ जुलै २०२४)

“श्रीमती अंजना पुंडलिक लहाने”,पद्मश्री* डॉ.तात्याराव लहाने, अठरा विश्व दारिद्रयातून संघर्ष करणारी .! लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील मौ.माकेगाव येथील दातृत्व.!मा.संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन,कोविड-१९,कोरोना जंतुसंसर्ग
नियंत्रण टास्क फोर्स प्रमुख महाराष्ट्र राज्य, अंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्लास्टिक सर्जन डॉ.विठ्ठल लहाने, यांची “माय”. अर्थात मातोश्री,.!डॉ.सुमीत लहाने, डॉ.सायली वाघमारे, डॉ.प्रसाद लहाने व अन्य नातवांची “आजी”.! आज सकाळी साडे पाचच्या सुमाराला वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.डाॅ.तात्याराव लहाने यांना आपली किडणी देवून काळजाच्या तुकड्यांला पुनर्जन्म देणारी माय,आज अनंताच्या प्रवासाला निघून गेली.सामाजिक उत्थानासाठी आम्हीही यथाशक्ती धावत असताना, “अंजना माईसी,”दर्शन झाले आहे. पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्यावरील चरित्र संपादन करताना आम्ही घेतलेली भेट असो, डॉ.लहाने हाॅस्पीटल लातूर येथे डॉ.प्रकास आमटे, विकास आमटे, अण्णा, पुंडलिक लहाने यांच्या हस्ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या हाॅस्पीटलचे उद्घाटक असो, डॉ.सुमीत सरांच्या अंबाजोगाई येथील मंगल विवाहसोहळयातील भेट असो, “लहाने नेत्रालय” प्रभादेवी मुंबई येथील उद्घाटक मा.शरद पवार, अतिथी बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, सुनील केदार, अमित (भैय्या) देशमुख, आदित्य ठाकरे, पंकजाताई मुंडे, डॉ.प्रितमताई मुंडे, डॉ . तात्याराव लहाने,डॉ.रागिणी पारेख यांच्या उपस्थितीत झालेल्या सामाजिक सोहळ्यात आसो, दिवंगत अंजना मायीचं आम्ही चरणस्पर्श दर्शन घेतलं.दिलेला आशिर्वाद अन् जेवून घ्या.हे शब्द आजही स्मरणातून जात नाहीत.आशा मातृत्वाची आज महाराष्ट्राला गरज आहे.स्नूषा बारा डॉक्टर,कायदा विधी आशा विषयात पारंगत आसलेली, अमेरिका,लंडन,परदेशात न जाता,गरीब , गरजू व‌ असहाय्य रूग्णांना वैद्यकीय सेवा देणारी वारकरी संप्रदायातील लहाने परिवाराची “अंजना माय” अन् आमच्या सारख्या हजारो समाज सेवकाची “माऊली”.! आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनाला, अनंताच्या प्रवासाला निघून गेली.परत कधीही न येण्यासाठी.! डॉक्टर तात्याराव लहाने सर , डॉ.विठ्ठलराव लहाने सर, डॉ.सुमीत लहाने सर, डॉ.प्रसाद,आपल्या लहाने परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.भावपूर्ण अभिवादन “अंजना माई!”@ समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे, महाराष्ट्र शासन! अध्यक्ष रूग्णहक्क संघर्ष समिती, ठाणे जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स, सोशल मीडिया ठाणे, विशेष कार्यकारी अधिकारी( SEO ) ठाणे जिल्हा+९३२४३६६७०९

Leave a Comment

× How can I help you?