गणेशोत्सवात धर्मवीर आनंद दिघे एक्स्प्रेस सुरू करा; खासदार नरेश म्हस्के यांना साकडे

ठाणे : कोकणवासियांना गणेशोत्सव म्हणजे पर्वणी असते, मुंबई-ठाणे परिसरातील चाकरमानी गणेशोत्सव काळात हमखास कोकणातील गावी जातातच. पण नियमित गाड्यासह गणपती स्पेशल गाड्यांचेही आरक्षण काही मिनिटातच फुल्ल होत असल्याने ठाणे – मुंबई परिसरातील कोकणवासीयांचे ऐन गणेशोत्सवात अक्षरशः हाल होतात. तेव्हा, कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवात (०७ सप्टेंबर २०२४ पूर्वी) ठाणे ते थिवीम मार्गावर धर्मवीर आनंद दिघे एक्स्प्रेस (अनारक्षित) किमान तीन दिवस अगोदर (परतीच्या प्रवासासह) चालवण्यात यावी. जेणेकरून ठाणे शहरातील तसेच ठाणे लगतच्या प्रवाशांना या गाडीचा लाभ होऊन चाकरमानी गणेशभक्त सुरक्षित प्रवास करतील, असे कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने खा. म्हस्के यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.

वास्तविक मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानक हे महत्त्वाचे स्थानक असुन धर्मवीर आनंद दिघे हे ठाणेकरांचे श्रद्धास्थान आहेत. किंबहुना, ठाणे स्थानकातून कोकणात मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असल्याने धर्मवीर आनंद दिघे यांच्यासारख्या थोर समाजसेवकाला आदरांजली वाहण्याकरिता एनडीए सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने या मागणीवर प्रकर्षाने विचार करावा. अशी मागणी चाकरमान्याकडुन जोर धरीत आहे. या अनुषंगाने गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाचे राजु कांबळे, संभाजी ताम्हणकर,सुनील गुरव, दर्शन शेट्टी, रुपेश शिंदे, अमित चव्हाण, मिलिंद सावंत, प्रमोद घाग आदी उपस्थित होते.

Leave a Comment

× How can I help you?