दिवा रेल्वे प्रवाशांच्या समस्यांसाठी आमरण उपोषण

ठाणे : दिव्यातील समाजसेवक अमोल केंद्रे यांनी 21 मार्च 2023 रोजी एल्गार मोर्चा काढून निवेदन दिले होते प्रसंगी रेल्वे प्रशासनाने पावसाच्या अगोदर होम प्लेट फॉर्मचे काम पूर्ण करून दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल चालू करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच दिवा स्थानकातील फलाट क्र 5 वरील शौचालय गेल्या दीड वर्षभरापासून अद्यापही बंद अवस्थेत आहे. आरक्षण खिडकी संदर्भात वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे. सर्व जलद लोकल दिवा येथे थांबवण्यात याव्यात. सर्व जलद लोकल अगोदरच भरून येत असल्याने काही जलद लोकल कल्याण येथून सोडण्यात याव्यात यावरही अद्याप तोडगा निघाला नाही. दिवा शहरातील नागरिकांची महत्वाची मागणी होती ती म्हणजे दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल चालू व्हावी परंतु अजूनही रेल्वे प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने अखेर आज १६ ऑगस्टपासून दिवा रेल्वे स्थानक पूर्व येथे अमोल केंद्रे आमरण उपोषणास बसले आहेत.

दिवा स्थानकात दररोज नागरिकांचे लोकलच्या गर्दीमुळे अपघात होवून अनेक बळी जात आहेत तर हजारो जखमी होऊन अपंग झाले आहेत. नागरिकांचे जीव वाचवायचे असतील तात्काळ दिवा मुंबई लोकल सुरु करावी राजकारणापेक्षा दिवा शहरातील नागरिकांचे जीव महत्वाचे आहेत. श्रेय नको नागरिकांना सुविधा द्या त्यांचे जीव वाचले पाहिजेत. तसेच दिवा स्थानकातील इतर समस्या सोडवण्यासाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल केंद्रे यांनी अनेक निवेदने देऊनही प्रश्न सुटत नसल्याने उपोषणास बसले. उपोषण प्रसंगी दिवा रेल्वे स्टेशन प्रबंधक श्री गुप्ता, रेल्वे सुरक्षा बलाचे वपोनि गिरीषचंद्र तिवारी तसेच ठाणे जीआरपीचे महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी उपोषणस्थळी भेट देऊन गेले.

Leave a Comment

× How can I help you?