आक्रमक पॅंथर ढाले साहेब,निळा सलाम!
(जयंती : ३० सप्टेंबर २०२४)
आम्हाला वाटलं नव्हतं एवढया लवकर आपण एक्झिट घ्याल..? आपल्या वाढदिवसाऐवजी आपल्या जयंतीला जड अंतःकरणाने व्यक्त होतोय.! साठ सत्तरचा काळ, मानव मुक्तीचे प्रणेते परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर बहूजनांच्या प्रश्नांवर लढणारा “राजा ढाले” बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक, तत्वनिष्ठेच्या नभांगणातला अढळ ध्रुवतारा!
इस.सन.१९७२ ला अमेरिकतील ब्लॅक कॅटच्या धर्तीवर अरेला कारे.. म्हणणारी “दलित पँथर” साहित्यीक ज.वि.पवार, प्रा.अरूण कांबळे सर, विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या विचारांने काढली.अन्याय, अत्याचाराला वाचा फोडणा-या निखा-यांनं स्फूलींग चेतवलं.!राजा ढाले साहेब म्हणायचे,हा समतेचा लढा आहे.अखेरचा एक माणूस जरी उरला तरी त्यानं समतेसाठी लढायला हवं, शेवटी माणूसच उरलाच नाही तर “समता” कोणासाठी? समतेसाठी जगल पाहिजे समतेसाठी लढलं पाहिजे अन्यथा आपण विषमतेतच मरणार आहोत.मरण जर अटळ असेल तर समतेचा लढा अटळ का असू नये?रोकडा सवाल असायचा,मराठवाडा विद्यापीठाला “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांचे नाव द्यावे म्हणून नामांतराचा मोठा संगर उभा राहिला तो पॅंथरमुळेच.! रिडल्स्वाद, घाटकोपर रमाई दुर्घटना,महाड चवदार तळे, भीमा कोरेगाव शौर्यस्तंभाला मानवंदना, दीक्षाभूमी नागपूर, चैत्यभूमी दादर, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी दादर मुंबई इंदूमिलच्या जागेत हस्तांतरित लढ्यात आक्रमक लढा पॅंथरने दिला.बाकी सेनानी होते.
रिपब्लिकन ऐक्य झाले.आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर,रा.सु.गवई, रामदास आठवले साहेब ,जोगेंद्र कवाडे सर, खासदार झाले.शासनकर्ती जमात उभी रहात आहे आसा आसेचा किरण बहूजनांच्या लेकरांना वाटत असतांनाच हेवेदाव्यातून रिपब्लिकन ऐक्य फुटले.सवते सुभे उभे राहिले.आंबेडकरी अनुयायी सैरभैर झाले.काळाची गरज ओळखून बरेच प्रस्थापित पक्षात गेले.१२% मतांची विभागणी झाली.आज एकहाती विजय मिळवून देणारे नेतृत्व मतपेटीतून निर्णायकी विश्वास देणारं बहूजन मतदाराला दिसत नाही.
एका डोळ्यात बुद्धांची करूणा आणि दुस-या डोळ्यात क्रांतिसूर्य संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष राजा ढाले साहेब आपण अनुभवला हे सोप्पं नाय! आपण करून दाखवले शब्दांतीत आहे हे रसायन.! बंडखोरपणाचा झेंडा शेवटपर्यंत खाली पडू दिला नाही. अरे रडता कशाला? अजून आपल्यातला अखेरचा पुरुष मेलेला नाही,आपला वंशविच्छेद झालेला नाही.तसं पाहिलं तर प्रत्येक माणूस अखेरचाच असतो.म्हणूनच तो प्रत्येक लढाई ही अखेरची समजून निकराने का लढत नाही.? कारण शेवट हा ठरलेला असतो.एकतर लढाई संपेल , एकतर आपण संपू.. आक्रमक पॅंथर, बहूजन साहित्य ,नवजागरण कलेतील डॅशिंग नेतृत्वाची आज जयंतीच्या निमित्ताने सरांच्या स्मृतीला उजाळा दिला.भावपूर्ण अभिवादन सर..निळा सलाम!
समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे
महाराष्ट्र शासन! पत्रकार +९३२४३६६७०९