न्यायदेवतेच्या हाती तलवारीऐवजी ‘संविधान’

 

BIGG THANKS CHANDRACHUD SIR
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या मते कायदा कधीही आंधळा असू शकत नाही आणि म्हणून न्यायदात्याच्या लायब्ररीमध्ये न्यायाचं प्रतिक असलेल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढून टाकली असून हातात तलवारी ऐवजी “संविधान” दिले आहे. कायदा शिक्षेचा प्रतिक नाही. तो सर्वांना समानतेच्या नजरेतून पहात असतो.ही मुल्ये रूजविण्यासाठी “जागर” करणं ही तुमची आमची काळाची गरज आहे असे आम्हाला वाटते.

एका हातात समानतेचा तराजू तर; दुसऱ्या हातात तलवारीऐवजी “संविधान”, असलेली लेडी ऑफ जस्टीस सर्वोच्च न्यायालयाने समोर आणली आहे.
LATE BUT RIGHT DESIGNS !

देशातील सर्व उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालय,न्याय देत असताना संविधानाचा अन्वयार्थ लावत असतात. किंबहुना तो त्यांचा अधिकार आणि कार्यक्षेत्रदेखील ! “न्यायाधीश” व्यक्ती बघून नव्हे तर गुन्ह्याची गंभीर नोंद,साक्षी, पंचनामे यांच्या चारी बाजूंचा अभ्यास करून कायदा काय सांगतो?त्यानुसार “न्याय” देत असतात.! त्यामुळे लेडी ऑफ जस्टीसच्या डोळ्याला पट्टी हे तसे अनाकलनीय आणि हास्यास्पदच वाटत होते. आणि म्हणून ह्या बदलाचे स्वागत करायला हवे.लोकप्रतीनिधी व युवा पिढीला जाणीव व्हावी म्हणून संविधानिक मूल्याधिष्ठित समता, बंधुता, न्याय सांगणारं संविधान प्रस्ताविका तैलचित्र शाळा, महाविद्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था,सरकारी आस्थापनेच्या मध्यवर्ती भींतीवर लावायलाच हवे !
LAST BUT LEAST..

हा पुतळा बसवून बदल केलाच आहे तर त्याला जोडून आणखी एक बदल आमच्यासारख्याला सूचवावासा वाटतो. ‘लेडी ऑफ जस्टीस’ला दैवत्व बहाल करू नये. देव्हाऱ्यातून बाहेर काढायला हवे. ती देवता नसून प्रतिकात्मक मूर्ती होय. या मूर्तीला कोणता पर्यायी शब्द देता येईल का? यासाठी अभिजात प्रयत्न व्हावेत.
ही अपेक्षा…

जय जवान जय किसान!
जय संविधान !
जय भारत !!

समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे
महाराष्ट्र शासन सोशल मीडिया, ठाणे जिल्हा ग्रामीण
९३२४३६६७०९

Leave a Comment

× How can I help you?