वांद्रे येथील सेंट टेरेसा शाळेत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांसाठी बॅज बनविणे, फ्लॅग तयार करणे, चित्रकला, निबंध आणि वकृत्व इत्यादी स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका मारिया व्होरा यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दहावीतील ज्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांत चांगले गुण मिळविले होते त्यांचा स्कॉलरशिप देऊन गौरव करण्यात आला.
आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी ढोलताशांच्या गजरात मार्चपास्ट सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते तसेच नृत्य सादर केली. शाळेचे मुख्याध्यापक फादर निकी, उपमुख्याध्यापिका रोझ लोबो, पर्यवेक्षक फिलिप रॉड्रिग्ज तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. शाळेतील इयत्ता सातवीच्या कमिटीने या प्रजासत्ताक दिनाचे यशस्वी आयोजन केले होते.