३१ जानेवारी .. बरोबर १०५ वर्षांपूर्वी याच दिवशी All time great #Legend डॉ. भीमराव रामजी आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’ पाक्षिकाच्या रूपाने पत्रकारितेच्या दुनियेत दमदार पाऊल टाकलं. पोयबावडी दादर मुंबई.!
संपादक म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेच्या क्षेत्रात उतरत आहेत याची भनक लागताच काही तथाकथित चातूर्वर्णीयांच्या भुवया उंचावण्यास सुरुवात झाली होती. जो काही मावेजा असेल तो देण्याची तयारी असताना “मूकनायक” सुरू करण्याची जाहिरातदेखील ‘केसरी’च्या तत्कालीन संपादकाने नाकारली. पण माघार घेतील ते डॉ .बाबासाहेब कसले ? अखेर ३१ जानेवारी १९२० ला प्रस्थापितांच्या पारंपारिक प्रांताला भेदत मूकनायकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.याची जाणीव आजच्या “मूकनायक ” वर्धापनदिनाच्या निमित्ताने करावीशी वाटते. पत्रकारिता लोकशाहीचा आधारस्तंभ, “चौथास्तंभ” म्हणून आमचे मार्गदर्शक दैनिक सकाळ वृत्तसमुहाचे मा. व्यवस्थापकीय संचालक उत्तम कांबळे सरांनी बरंच योगदान दिले.त्यांचं “फीरस्ती” सदर पत्रकारितेचं अंतर्मन आम्हाला भावलं.
आमचे स्नेही कीरण सोनवणे यांनी खूप खस्ता खाऊन शोध पत्रकारिता करीत वादळ पेलण्याची क्षमता ठेवून पुढे आले.max maharatra तून आज जवाबदारी बजावत आहेत.नुसते बजावत नसून आज “मूकनायक” वर्धापनदिनाच्या नागपूर येथील कार्यक्रमात पाहूणे आहेत असं समजलं.धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालूक्यातून अत्यंत कठीण परिस्थितीतीवर मात करून सा.साक्षी पावनज्योत साप्ताहिक सुरू आहे.असे अनेक भावंडं असतील..
परंतु “मूकनायक” संपादक डॉ.बाबासाहेबांच्या संघर्षपूर्ण आणि धगधगत्या वाटचालीतील “वणवा” म्हणजे आज आमचं “मूकनायक “प्रेरणास्थान होय.त्याची जागा अजून तरी कोणी घेतली नाही.ग्लोबल नीती मान्य,पण फक्त पेड न्यूज,याची व्याप्ती फोफावत चालली आहे का? अनुत्तरीत प्रश्नाची उकल होत नाही.ऐंशी नव्वदच्या दशकात शोषीतांच्या, कामगारांच्या वेदनांना निळूभाऊच्या दै.नवाकाळ,दै.सकाळ वृत्तपत्र समूह ,दैनिक लोकमतने वंचिताच्या वेदना उजागर केल्या.कालकथित बबनरावांच्या दैनिक वृत्तरत्न सम्राटने आमच्या मनात घर केले, पण रिपब्लिकन ऐक्य जसे हेकेखोर नेतृत्वांनी बेचिराख केले.त्याच पावलांनी दै. शासनसम्राट आला का? मीमांसा” मी ,करणार नाही.पण बातमी मागची बातमी हेच सांगते.पत्रकार म्हणून सामाजिक उत्थानासाठी अविरत श्रमणाऱ्या आमच्या सारख्यां हजारोंना खेद वाटतो.संपादक कुंदनजी चालवतात चळवळीचा भाग बनून..!
आजचं संक्षिप्त अधोरेखित करताना भूतकाळाशी गुंफताना भविष्यकाळ उज्ज्वल रहावा हीच “मूकनायक” वर्धापनदिनाच्या निमित्ताने महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर यांना निळा सलाम!१०५ वर्षे झाली तरीही “मूकनायक” “आम्हाला नव्या उमेदी, जाज्वल्य जाणिवा, दिशादर्शक प्रेरणा आणि अखंड उर्जा देत का देतात ? याचा विचार आजच्या संपादक, नवोदित पत्रकारिता क्षेत्रातील बांधवांनी करणं गरजेचं आहे.आसं सा.साक्षीचा उपसंपादक म्हणून आम्हाला वाटते. स्मृती, आपापल्या परीने जपत त्या पिढ्या दरपिढ्यांच्या स्वाधिन करायला हव्यात असं आम्हाला सामाजिक बांधिलकी म्हणून मनापासून वाटतं.
म्हणूनच त्यानुषंगाने आम्ही छोटासा प्रयत्न केला…
माझी प्रेरणा पद्मश्री नारायणदादा सुर्वे अर्थात माझे विद्यापीठ ,यांच्या “दोन दिवस” कवितेनं मला चिक्कार उर्जा दिली.लातूर जिल्ह्यातील जन्मभूमी मौ.गोंदेगाव येथील भूमीहीन शेतमजूर निरक्षर सदाअण्णांचा “तात्या” यांनी गाव सोडले.ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात आलो.खाजगी कंपनीत काम करीत सामाजिक उत्थानासाठी अहोरात्र मेहनत घेतली.गरिबी जगत असताना “प्रेरक मूकनायक “,माझ्या जगण्यातील दीपस्तंभ होय सर! शैक्षणिक, वैद्यकीय असहाय्य विद्यार्थ्यांना, रूग्णांना मदत करीत, साहित्यसेवा “जागल्या “, वैद्यकीय मदत व माहितीचा अधिकार,जुलै २००५ महापूर थैमानातील आक्रंदन उभं केलं.शाळा उपेक्षेची , “दृष्टिदाता” पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने सर यांच्यावरचं चरित्र संपादन केले .लढाई कोरोनाशी-कोविड १९ विशेषांक आर्थिक परिस्थितीमुळे अप्रकाशित आहेत. माझ्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने १२ मार्चला “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” समाजभूषण पुरस्कार समारंभपूर्वक सोहळ्यात प्रदान केला.मूकनायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बदलापूर भूमीला नतमस्तक होताना लोकनेते आदरणीय किसन कथोरे (आप्पा) आमदार मुरबाड विधानसभा यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सोनिवली येथील महत्वकांक्षी राष्ट्रीय पातळीवर लक्षवेधी विकासाच्या अभिनव उपक्रमांनं भारावून गेलो.
चैत्यभूमी , दीक्षाभूमी,कडे जाणा-या भीमअनुयायांची पावलं सोनिवली येथील स्मारकाकडे वळतील आसा आम्हाला आत्मविश्वास वाटतो. भावंडानों , निरक्षर कालथित सदाअण्णांचा “तात्या” ते साक्षर सुकन्या आम्रपाली, सुकन्या वृषाली, चिरंजीव सुयोगचा पप्पा, आयु.तात्यासाहेब सीताबाई सदाशिव सोनवणे! उद्या ०१ फेब्रुवारी जन्मदिवस गुरूच्या गुरुंना नतमस्तक होऊन साधेपणाने आपल्या हजारो सर्जनशील मनाच्या श्रीमंतीला जयभिम करून साजरा करतोय .! ५७ वर्ष संघर्षाची. २९ वर्ष समाजसेवेची.! “भावंडानों” स्वतःचा एक खोपा असावा असे सर्वांनाच वाटते.बदलापूरमध्ये सहचारिणी सौ.शर्मिलाच्या मदतीने एक घर बांधावं. अन् खरं सांगू? त्या घराला “मूकनायक” नाव द्यावे.! मी पाहिलेलं ‘मूकनायक” स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी, धडपडताना शहरात शासकीय रक्तपेढी व कर्करोग,ह्रदयरोग,मधूमेह आशा असहाय्य आजारांवर मात करण्यासाठी, किमान “वैद्यकीय मदतकक्ष” ,रेन्बो, संगोपिता सारख्या मूकबधीर, कर्णबधिर शाळांना ,गतीमान करावं. इन्फ्रास्ट्रकचर बदलापूर शहरात ,उद्योजक, समाजसेवक, सेवाभावी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांच्या सहकार्याने उभा रहावा. कुळगाव बदलापूर नगरपरिषद येथे मध्यवर्ती भागात भारतीय लोकशाहीचा आत्मा संविधान उद्देशिका प्रतिमा लावली जावी.जेणेकरून भावी पिढीला शाश्वत विकासाची दिशा कळेल हीच मुक्याची संवेदना!
After all Cultural Change is our ultimate goal !
जय भिम! संविधान!!
समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे
९३२४३६६७०९