कुत्रे आणि मानवांमध्ये एक अनोखे नाते आहे, म्हणूनच ते इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा मानवांच्या जवळ आहेत. हे असे प्राणी आहेत ज्यांच्याशी मानवांचे जवळचे नाते आहे. कदाचित म्हणूनच कुत्रे नेहमीच कुटुंबांचा एक भाग राहिले आहेत. परंतु अलिकडच्या दशकात त्यांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ एका नवीन समस्येला जन्म देत आहे, जी मानवी सुरक्षेसाठी धोका बनली आहे.
देशभरात कुत्र्यांव्यतिरिक्त इतर प्राण्यांनी चावल्याची एकूण संख्या सुमारे 27 लाख आहे आणि बळी पडलेल्यांपैकी सुमारे 20 टक्के मुले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात 15 वर्षांखालील मुलांना प्राण्यांच्या चाव्याचे 5 लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाया एकात्मिक आरोग्य माहिती प्लॅटफॉर्म पोर्टलवर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कुत्र्यांच्या चाव्याच्या एकूण 21,95,122 आणि माकडांसह इतर प्राण्यांच्या चाव्याच्या 5,04,728 प्रकरणांची नोंद केली आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या राष्ट्रीय महामारी विज्ञान संस्थेच्या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात असेही उघड केले आहे की भारतात दरवर्षी 5,726 लोक रेबीजमुळे मरत आहेत.
संशोधकांच्या मते गेल्या दोन दशकांत रेबीजमुळे होणाऱया मृत्यूंमध्ये लक्षणीय घट झाली आहे हे खरे असले तरी, 2030 पर्यंत कुत्र्यांमुळे होणाया रेबीजचे उच्चाटन करण्यासाठी भारताला अजूनही जलद पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
रेबीज हा एक विषाणूजन्य आजार आहे जो मध्यवर्ती मज्जासंस्थेला संक्रमित करतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (sंप्ध्) मते , “एकदा क्लिनिकल चिन्हे दिसू लागली की, ते 100ज्ञ् प्राणघातक असते. आशिया आणि आफिकेतील 15 वर्षांखालील 40 टक्के मुलांच्या मृत्यूचे कारण रेबीज आहे.
जगभरातील कुत्र्यांच्या चाव्याव्दारे होणाया मृत्यूंचे पूर्णपणे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जागतिक आरोग्य संघटना आणि त्यांच्या भागीदारांनी झिरो बाय 30 सुरू केले. जागतिक आरोग्य संघटना , जागतिक प्राणी आरोग्य संघटना , संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना आणि जागतिक रेबीज नियंत्रण संघटना यासाठी एकत्र काम करत आहेत.