भारत देशातील निसर्गप्रेमी अर्थात अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली सरांची प्राणज्योत मालवली. साहित्यश्रेष्ठ गो.नी.दांडेकरांचा प्रभाव,असलेल्या चितमपल्ली यांनी ३६ वर्षे वनाधिकारी म्हणून सेवा बजावली. सर फक्त निसर्गप्रेमी नव्हते तर ते एक महान मार्गदर्शक होते. पक्षीतज्ज्ञ डॉ.सालीम अली, साहित्य शिरोमणी व्यंकटेश माडगूळकर व प्रसिद्ध चित्रकार ए .ए. आलमेलकर यांच्याशी सरांचा विशेष स्नेह होता.
पद्मश्री चितमपल्ली सर एक महान मार्गदर्शक तर होतेच,परंतु त्यांनी आपल्या साहित्यातून अनेक पिढ्यांना संवाद साधायला शिकवलं. जंगलातील वन्य प्राण्यांचे जगणं, त्यांचं बोलणं, झाडाचं संवेदन कार्डिओग्राम अर्थात जंगलाच स्पंदन त्यांनी ‘आनंददायी बगळे’, ‘चकवा चांदन’ ,’रातवा’, ‘नवेगाव बांधचे दिवस’, ‘केसरांचा पाऊस’, ‘घरट्यांच्या पलीकडे’ ,’पक्षी जाय दिगंतरा’ अशा आपल्या २१ पुस्तकातून वन्यजीव अभ्यासक म्हणून मांडले. पद्मश्री चीत्तमपल्ली सरांनी निसर्ग जीवनानुभव,काकागार,सारगागार,राननिवारा असं नवं नातं शब्दबद्ध करून मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवरनेऊन ठेवले.
अगदी नजीकच्या काळात ३०एप्रिल २०२५ ला राष्ट्रपती द्रोपदीजी मुर्मू यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ झालेले मारुती चितमपल्ली सरांच्या” जाण्याने मराठी साहित्य क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली.कधी न भरून येणारी..! मेळघाट व्याघ्र प्रकल्प, नागझिरा अभयारण्य ,कर्नाळा पक्षी अभयारण्य ,प्राण्यांच्या, विकासाठी पद्मश्री मारुती चितमपल्ली सरांनी भरीव योगदान दिले. झाडाच्या, पानांच्या ,पाखरांच्या मरणकळा,बारकाव्याने टिपल्या .वनाधिकारी म्हणून 36 वर्षे बारक्यावर रेखाटल्या अशा या महान ऋषीतुल्य निसर्गप्रेमीला विनम्र अभिवादन करताना त्यांच्या आठवणी नुसत्या स्मरणात नाही तर साहित्यिक , सामाजिक उत्थानासाठी अविरत श्रमणाऱ्या आमच्या सारख्यांना कायम वेदना देत राहतील.
मारुती चितमपल्ली यांच्यातला अरण्य ऋषींचा प्रवास , अभ्यासक म्हणून नवीन पिढीला कायम प्रेरणा देत राहील याबद्दल शंका नाही. विशेष गाजलेलं साहित्य अपत्य पक्षी जाय दिगंतरा, होय.!
संत जनाबाईंना स्मरून,
पक्षी जाय दिगंतरां ।
बाळकांसी आणी चारा
घार हिंडते आकाशीं ।
झांप घाली पिल्लापासीं
माता गुंतली कामासी ।
चित्त तिचें बाळापाशीं !
पद्मश्री चितमपल्ली सर अमर रहे.!
: समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे
महाराष्ट्र शासन
मो. ९३२४३ ६६७०९