क्रांतिकारी लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज

राजसत्ता खऱ्या अर्थाने वंचित बहूजनांसाठी राबविणाऱ्या क्रांतिकारी लोकराजाला शतदा वंदन!
( राजश्री शाहू महाराज जयंती विशेष 26 जून 2025)

लोकहो, राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने क्रांतिकारी लोकराजाला त्रिवार नतमस्तक होताना धन्य वाटते. आजच्या दिवशी व्यक्त होताना शिकल्या सावरलेल्या तमाम बंधूभगिनींना शुभेच्छा न देता ‘जागे व्हा’ अशा पोटतिडकीने वंचितांच्या वेदना बोलक्यांच्या संवेदना व्हाव्यात म्हणून, सामाजिक न्यायदिनाच्या निमित्ताने ‘जागल्या’ गस्त घालतोय!

आज संविधानाचा चौथा आधारस्तंभ म्हणून व्यक्त होत आहे. घरट्यातील मायेनेच पिल्लांचे पंख छाटले तर पाखरांनी जीवनदान मागायचे कोठे? शोषितांच्या वेदनांना न्याय कोठे मागणार? गांभीर्यपूर्वक आणाभाका, शपथविधी सोहळ्यात उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीने समाजमनाचा ठाव घ्यायला हवा. उदयाला येत असलेल्या नव्या पिढीला कोणता आदर्श मायबाप न्यायदाते आज भारतीय संविधानाचे पालन करीत देत आहेत?

तत्कालीन विचारवंतानी राजर्षी शाहू महाराजांना ‘क्रांतिकारक राजा’ असं संबोधलं! अभ्यासक म्हणून आमच्या नजरेस आजपर्यंत कोणत्याही राजाचं वर्णन ‘क्रांतिकारक राजा’ म्हणून पडलं नाही. आमच्या वाचनात आले नाही. ‘छत्रपती शाहू’ राजे असूनही अन्याय स्थापित व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारून समता ,बंधुता, न्याय प्रस्थापित करण्यासाठी 26 जुलै 1902 रोजी पन्नास टक्के जागा सरकारी नोकरीत मागासवर्गीयांसाठी राहतील आसा वटहुकूम काढून आपल्या देशात या समताधिष्ठित नव्या क्रांतिची मुहूर्तमेढ रोवली. यामुळं शोषणजीवींना हा आदेश म्हणजे त्यांच्या कुस्थापित अर्थात उभी राहिलेली जुलमी शोषणशाही मूळासकट उखडून टाकणारा कायदा होय. नव्हे? यामुळे राजश्री शाहू महाराजांवर प्राणघातक हल्ला झाला. ब्रिटीश राजवटीकडे खोटे आरोप करून महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले; इतकंच काय, राजवाड्याच्या भिंतींना रक्ताच्या पंजाचे ठसे उमटवून अस्थिरता निर्माण केली. अशा प्रसंगी धोका पत्करून राजश्रींनी क्रांती केली.

बहूजन समाजाची प्रगती शिक्षणामुळेच होऊ शकते हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी पाणवठ्यावर उभं राहून सांगितले आणि म्हणून की काय, मानव मुक्तीचे प्रणेते संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अगोदर ‘गाव तिथे शाळा’ मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी सरकारी खजिना रिकामा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक बळ दिले. दिलदार लोकराजा कोल्हापूरहून बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी मुंबईला आला. मानाचा फेटा बांधला. राजर्षी शाहू महाराजांनी गावकुसाबाहेरील रंजल्या गांजलेल्या रयतेला माणगाव मार्च 1920 कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे भरलेल्या परिषदेत, राजश्री शाहू महाराज आवर्जून उपस्थित राहिले.अन् अस्पृश्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या तुम्हाला नेता मिळाला, असे उपस्थितांना ठणकावून सांगत संजीवनी दिली.
डॉ.भीमराव तथा आंबेडकर यांना घडवणारी ऐतिहासिक माणगाव परिषद! आज प्रशासकीय सेवेत आरक्षणाचा लाभ उठवत गर्भ श्रीमंतांना, प्रशासकीय अधिकाऱयांना ज्ञात आहे की नाही? आज किती जण लोककल्याणकारी राजाला मानवंदना देतो? बार्टी मधून उच्च शिक्षण घेतलेले तरी कृतज्ञतेने नमन करतात? राधानगरी धरणाची उभारणी सुजलाम सुफलाम कृषी क्षेत्राला चालना, महिलांचा उद्धार, औद्योगिक विकास अर्थात उक्रांती होय!

26 जुलै1902 रोजी सरकारी नोकऱयांतील 50 टक्के जागा मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश काढून भारतात एका नव्या क्रांतीचा आरंभ ह्या मानवतावादी मूल्यांकन रोखठोक आपल्या राजसत्तेत केल. कुस्थापित शोषणजीवींना हा आदेश आपणाला मुळासकट उपटून फेकणारा आहे हे कळून चुकलं आणि महाराजांवर मानसिक, प्राणघातक हल्ले सुरू केले. ब्राह्मण नोकरशाही ही पेंढाऱयांपेक्षा वाईट आहे यातच ब्राह्मणेतर चळवळीचं मूळ आहे.’

‘बहुजन समाजाची उन्नती केवळ शिक्षणाने होणार’ हे क्रांतिसूर्य जोतीरावांनी वारंवार सांगितले म्हणून राजर्षींनी ‘गाव तिथे शाळा’ ही धडक मोहीम उघडली. त्यासाठी सरकारी खजिना रिकामा केला. ”not cake for a few unit all are served with bread” कठोर भूमिका घेत राजाराम कॉलेजचं अनुदान बहूजन शिक्षण घेत असलेल्या शाळांना का देवू नये? असं रोखठोक भाषेत खडसावले, यावर दैनिक ‘केसरी’ वृत्तपत्राने महाराजांना लक्ष्य केले. तरीही भावांनो, इतकं असूनही टिळकांच्या निधनाची बातमी कानावर पडताच जेवणाचं ताट दूर सारणारा मराठा क्रांतिकारी लोकराजा मानवतेचा उपासकच नाही का?

मानव मुक्तीचे प्रणेते संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला राजश्री शाहू महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्याच्या संदेशाचे पालन करू या. आरक्षणाचा लाभार्थी म्हणून सत्ता पद भोगत काजू बदाम खात असलेल्या मीठाला जागू या! आरक्षणाचे जनक क्रांतिकारी ‘लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना’ जयंतीनिमित्त नतमस्तक होऊ या.जयभिम! जय संविधान!!

‘जागल्या’ समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे
उपसंपादक सा.साक्षी पावनज्योत,
अध्यक्ष रूग्णहक्क संघर्ष समिती,
जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स,
सोशल मीडिया ठाणे जिल्हा.
मो. 9324366709

Leave a Comment