श्रद्धेय बाळासाहेब सांगा खरचं तुम्हांला काय वाचवायचं संविधान की भाजप

श्रद्धेय बाळासाहेब सांगा

खरचं तुम्हांला काय वाचवायचं

संविधान की भाजप…

 

दश्या नेत्यांच्या एक्याची

दश्या दलीत जनतेची.

खुप दमल्यावर त्रान निघून जावा

तसचं काहीस झालं होत,

परंतु वंचीतच्या उभारीन थोडका

कार्यकर्त्याला बळ आल होत,

 

काही आहेत लाच्यार काही बांधील

कुठे ना कुठे, कुणी कुणाच्या

दावणीला आहेत गुतून,

जमेलतशी फरफट मन गेलं विटून.

कुणीही यावं टिकली मारून जावं

अशीच जणू काही परवड झाली होती.

 

अश्यातच बाबासाहेबांच्या रक्तातील

जागरूक प्रकाश दिसला,

मरगळलेलां समाज

प्रफुल्लित होऊन हसला

तुम्ही दिलीत वाघाची हाक

संविधान बदलणं कोणाच्या बापालाही जमणार नाही.

हे ऐकून प्रत्येक आंबेडकरी व संविधांप्रेमी वीच्यारांच्या

अंगावर इंचभर का होईना,मास चढल्या सारखे झाले,

आणि संविधान वाचवायला तुम्ही पुढे सरसावला.

 

आणि जादुई अशिकी झाली बाळासाहेब माझ्या सारखे,

असंख्य तुमचे कधीच नसणारेही तुमच्या विचार सरणीने प्रेरित होऊन तुमचे प्रचंड च्याहते झाले….

बघता – बघता डोळे विस्फारनाऱ्या सभाही झाल्या,

चांद्या पासून बांध्या पर्यंत समाज एकवटू लागला.

बाबांच्या रक्तालाच साथ कानोकानी कानी गुणगुणू लागला,

छातीठोक दलीतनेता फक्त तुमच्यातच दिसू लागला

या वेळी एकला नकोच,समविचारी बरोबर चला असा गावागावात आवाज होऊ लागला,

साहित्यिक,आणि विचारवंत यांचा दबाव वाढू लागला,मग…?

 

मग समविचारी मोट बांधू म्हणाला,

संविधान विरोधकांना नडू लागला

बी टीमचा ठपका पुसू म्हणाला,

परंतु तुमच्या ओठात एक,आणि पोटात एक

प्रत्येक चर्चेत असेच जाणवू लागलं

आपण कायद्याचे तज्ञ,अभ्यासक,जाणकार असूनही

आपला मार्ग बदलतोय असे भासू लागले,दिसू लागले,

आणि शेवटी नेहमीच्या आपल्या सवयी प्रमाणे तेच झालं…

 

आघाडीतून किमान दोन/तीन खासदार पुढे दहा/बारा

वंचीतचे आमदार होतील स्वाभिमानाने मिरवता येईल

निळा झेंडा उंच हाताने गगनात फडकविताना येईल.

रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याला,

सुगीचे दिवस येतील असे वाटत असतानाच…

 

एकला चलो फतवा निघाला,

आणि चळवळीचे पुन्हा नुकसान झाले

या निर्णयातून काय साध्य होणार बाळासाहेब,

या मुळे आपले आणि वंचितचे उमेदवार निवडून

येणारच नाहीतच, परंतु समवीच्यारांचेच हरणार

मग वंचीतला नक्की काय करायचे आहे,

कोणाला हरवायचे आणि कोण जिंकवायचे आहे,

सांगा – सांगा,श्रद्धेय बाळासाहेब सांगा…

खरचं तुम्हाला काय वाचवायचंय सांगा ..?

“संविधान की भाजप”

————————-

डॉ.नंदकुमार ल,कांबळे.✍️

Leave a Comment

× How can I help you?