शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी,
विलेपार्ले येथील १९८७ च्या पोटनिवडणूकीत ज्वलंत हिंदुत्वाची भूमिका घेतली.त्य निवडणुकीत शिवसेनेने विजय संपादन केला.त्यानंतर त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकारसुद्धा गमवावा लागला.
परंतु त्याचवेळी ते राष्ट्रप्रेमी मुस्लिमांचे जाहीरपणे समर्थन करत होते.पण देशपातळीवर ते हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखले जाऊ लागले.त्यामुळे मुस्लिम मतदार मराठी भूमिपुत्रांची बाजू घेणाऱ्या शिवसेनेपासून मित्र दुरावला.हिंदू-मुस्लिम दंगलीत शिवसेना हिंदूची उघड भूमिका घेऊ लागली.त्यातून शिवसेना विरुद्ध मुसलमान असे दुश्मनी उघडपणे समोर आली.
पण आज उद्भव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि मुस्लिम समाज यांची जवळीकता महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाली आहे.उद्भव ठाकरे यांनी नुकतेच एक वक्तव्य केले.शिवसेना आणि मुस्लिम यांची दुश्मनीप्रमाणेच दोस्तीसुद्धा देशात चर्चेचा विषय झाला पाहिजे.
या नवीन समीकरणाला जन्म देण्यास कारणीभूत ठरली भाजपची रणनिती.भाजपने उद्भव ठाकरे यांचे राजकीय आकलन करताना चूक केली. यापूर्वीसुद्धा नारायण राणे,राज ठाकरे यांनी हीच चूक केली होती.
भाजपने उद्भव ठाकरे यांची गळचेपी करताना. दोनच पर्याय ठेवले शरण येऊन मांडलिकत्व पत्करा अन्यथा नष्ट व्हा! नंतरचा एकनाथ शिंदे यांची फूट आणि मूळ शिवसेना आणि चिन्ह सगळा इतिहास आपल्या सगळ्याना माहितीच आहे.
शिवसेनाप्रमुखपुत्र उद्भव ठाकरे हे ठामपणे मोदी-शाह यांच्या दडपशाहीसमोर उभे राहिले.आणि त्याचवेळी त्यानी आपली हिंदुत्वाची नव्याने व्याख्या केली.आमचे हिंदुत्व शेंडी जान्हवाचे नाही.हृदयात राम हाताला काम.असे सर्वसमावेशक हिंदुत्व त्यानी पुढे आणले.जाहीर सभेना संबोधित करताना, शिवसेनाप्रमुख इथे जमलेल्या तमाम हिंदू माता,भगिनी आणि बंधूनो असे म्हणत.परंतु आता उद्भव ठाकरे मात्र इथे जमलेल्या तमाम देशभक्त माता,भगिनी आणि बांधवानो असे करतात.यांमुळे फक्त मुस्लिमच नाहीतर ख्रिचन,बौद्ध,शिख आणि जैनधर्मीय सुद्धा सुखावले.
त्याचवेळी भाजपचे मुस्लिमद्वेष निर्माण करण्यासाठी ओवेसी बंधूचा वापर सुरु केला होता. हिंदू मतांचे मोठया प्रमाणात ध्रूवीकरण करून,निवडणूक जिंकणे हा एककलमी कार्यक्रम भाजपने सुरु केला होता. त्यासाठी देशात विखारी वातावरण तापवले जात होते.त्यात महाराष्ट्रात उद्भव ठाकरे यांच्या रुपाने,एक आशेचा किरण मुस्लिम समाजाला दिसला.
राज्यात तिसऱ्या टप्प्यापर्यंत मुस्लीम समाज, उद्भव ठाकरे यांच्या नेतृवाखालील महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान करत असल्याचे स्पष्ट होते आहे.आज मुस्लिम समाजाला काँग्रेसपेक्षा उद्भव ठाकरे यांची शिवसेना जास्त आश्वासक वाटते आहे.
यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेला उघडपणे मुस्लिम समाजाला पाठीबा मिळत आहे.सभाजीनगर, मुबईतील भायखळा,नागपाड येथील शिवसेना शाखेत मुस्लिम नागरिक आयुष्यत पहिल्यांदाच गेले असे त्यानी कबूल केले.
यामुळे मराठी आणि मुस्लिम मतांची बेगमी करत,आता उद्भव ठाकरे यांचा ममुद फॅक्टरमधील “ द “या विषयी तिसऱ्या शेवटच्या भागात नक्की वाचा.आपला महाराष्ट्र डिजीटल वेब पोर्टलला जोडून घ्या.
लेखक-अॅड. मनोज वैद्य.