आपले ठाणे तर तलावांचे शहर आहे पण एकूणच प्रत्येक गावात एक छोटा मोठा का होईना पण सगळ्या गावकऱ्यांचा लाडका असा तलाव असतो किंवा नदीचा किनारा असतो. एखादा जलाशय असतो. जिथे त्या माणसाच्या अनेक स्मृती लगडीत असतात . त्या तलावाच्या साक्षीने तो भावना विश्वात पण समृद्ध झालेला असतो.
तो गाव बदलतो ते शहर बदलतो आणि तो तलाव देखील बदलतो .नंतर काही वर्षांनी गावातला बुजुर्ग मग सांगू लागतो हो होता, पूर्वी इथे एक मोठा तलाव होता. त्याच्यात घाण वास येणारे शेवाळे घाणेरडे कीटक नव्हते. सकाळी या फिरायला येणाऱ्या लोकांबरोबर तो धुक्यातून बाहेर येऊन हळूच हात बाहेर काढून, बाय बाय बोलत असे. दुपारच्या तीव्र उन्हात अंग आकसून घेत असे .सूर्याच्या तीव्र किरणांमुळे येणारे कवडसे आणि चकाकते पाणी आणि न सोसणारा,ऊर्जा शोषणारा ताप उष्णता बघे.पण पानांनी झाडाच्या सावलीने तो उन्हाची झळ झाकायचा प्रयत्न करत असे.
पूर्वी, संध्याकाळी शांत होऊन तलावाकाठी फिरायला आलेल्या बालकांचा,त्यांच्या हसण्याचा आनंद घेत असे.रमून जाई आणि रात्री चंद्र चांदण्यांना मिठी घालून खुश होत असे. आता तो तलाव कुठे गेला?
उन्हाळ्यात पूर्वी त्याच्याभोवती हिरव्या झाडांची वस्त्र असायची. झाड जास्त होती.तो काठावरचे झाडांनी थोडाफार स्वतःला अवगुंटून घेत असे. आता मात्र पूर्ण नग्न असल्यासारखा,काही झाड तोडल्यामुळे तो भकास दिसतो. कुठेही जाऊ शकत नाही ना !त्यामुळे तिथल्या तिथे जागी पडून ,तो बदलत्या जीवनाने ,होणाऱ्या विकासाने झालेले भकास ऊन,थंडपणे बघत बसतो .बांधकामाच्या ,फोडाफोडीच्या ,कचऱ्याच्या ,अपमान करणाऱ्या जखमा शोषत राहतो,सोसत राहतो.
एक वेळ होती तेव्हा तो तलाव जिवंत होता. त्याच्यावर मंदपणे होड्या तरंगत असलेल्या .लोक बोटिंग करत असायचे. त्या तलावात कासव होते,मासे होते .निर्माल्याचा कचरा भरलेला नव्हता .
आता ही तो तलाव जिवंत आहे पण त्याला थकान जाणवते,तो हे जीवन आपलं अस्तित्व उद्या राहील की नाही अशी भीती वाटत असेल का? या विकासात आपला बळी जाईल असं वाटतं का जिवंत राहण्याची शाश्वती त्याला वाटत असेल का?
तलावालाच असं पूर्वी वाटलं असेल का, की तो आता जसा आहे तस त्याने बनाव? का नाईलाज आणि अगतिकता,अचलत्व यामुळे आहे ते,आहे तिथे आक्रसून जाणे त्यांनी स्वीकारलं आहे?उन्हाळ्यात बाष्पीभवनाने ,पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याने तो तसाच राहतो का ?का आपल्यात ती भावना जपत ,कधी कोमेजत,कधी हसत आनंदात राहतो का? आहे ते त्या तलावानी स्वीकारले आहे कया? भेटीगाठीसाठी डेटिंग साठी येणाऱ्या मुला मुलींच्या गप्पांमध्ये तो स्वतःला हरवून बसत असेल का? आजूबाजूच्या भिकाऱ्यांच्या प्रश्नांनी तो खलबलून जात असेल का ?बालकांच्या हसण्याने उमलत असेल का?
त्या तलावाने बदलू नये.पण बदलला. जुन्या आठवणींच्या भुतावळी या वारंवार कुणीतरी नंतर उचकटून काढतात. तसं होते.पण अधिक नाश न होता शांतपणे एखादा अत्तर शिंपडावे तसेच त्या तलावाने जिवंत राहावं.असाव आणि लोकांना आनंद द्यावा .
कचरा?गुटक्याची पाकीट ,शाम्पू चे सॅशे,कुजणारे पान ,चिखल, कचरा, काड्या, कुठे प्लास्टिकच्या बाटल्या सगळ्यांनी स्वतःला नको असलेला मागे टाकलेला कचरा या तलावाने पोटात घेतलाय .या वस्तू जिवंत नाहीत आणि त्या तलावाच्या जिवंतपणाचे लक्षण देखील नष्ट करत आहेत.
पण पूर्वी कधीतरी हा जो तलाव होता ना तो हसरा आणि आनंदी होता .असा नव्हता जो आता आहे .आकुंचन पावलेला आकसून गेलेला ,अस्वच्छ झालेला आणि गर्दीने भांबावलेला असा का झालाय? गडकरी रंगायतन सारख्या सुप्रसिद्ध वास्तूचा टिळा तो कपाळावर लावतोय .पण त्याच चौकात रस्ता पार करायला सुद्धा भीती वाटावी, इतकी गर्दी आणि वाहनांचा हल्लकल्लोळ असतो .वेगळ्या वेगळ्या बार्स चा, हॉटेल्सचा विळखा आहे.ट्रॅफिक इतका आहे की ,पाहुणे येतात,त्यांची वाहन रस्त्यावर वाकडी तिकडे लागलेली असतात .
का तलाव सुद्धा माझ्यासारखाच जुना जुना होत चालला आहे?थकत चालला आहे? रोजचं नैमित्तिक तर कोणाला चुकत नसतं. सकाळ होणं ,दुपार होणं, संध्याकाळ होते.सूर्य आकाशी येणार,दिवस होणार ,रात्र होणार आणि दिवस संपला, कॅलेंडरची एक तारीख पुढे सरकली, हे तर चक्र चालूच असतं. वेगवेगळे ऋतूही बदलत राहतात या चक्राचा परिणाम जसा माझ्यावर होतो तसा या तलावावर पण होत असेल ना !
हो पण पूर्वी कधीतरी हा तलाव खूप सुंदर होता. आजही तो तलाव तिथे आहे पण पूर्वी हा तलाव खूप खूप छान होता. आपल्या देशातील बहुतांश जलाशयांची स्थिती अशीच झाली आहे का पाण्याची कमतरता जाणवण्यापूर्वीच या तलावांचा संवर्धन अधिक चांगल्या प्रकारे करायला हवं झाडांना अजून अजून न तोडता भरपूर झाडे लावायला पाहिजे सिंगापूरच्या धरतीवर व्हर्टिकल गार्डन बनवली तरी चालेल. मी या बाकीची बाग बनवू शकतो .पण हा तलाव सुंदरच राहू देत.
**
शुभांगी पासेबंद ठाणे