टेन्शनमुक्त प्रजातंत्र

राजाला आता टेन्शन आलंय लढायचं

‘चारशे’ संस्थान खालसा करून
पुन्हा सत्तेवर येण्याचं
टेन्शन आता राजाला आलंय …

कुठली नीती, कुठला पेच टाकायचा
काहीच कळेनासं झालंय;
आपणच पुन्हा ‘ सम्राट’
कसं व्हायचं काहीच कळेनासं झालंय…

हेच टेन्शन राजाच्या सैन्याच्या
चेहऱ्यावरही दिसू लागलंय,
घोषणा जोरदार देतं सैन्य
पण त्या घोषणा
400 पार काही पोहोचत नाहीत
हे त्यांनाही आता कळलंय
म्हणूनच सैन्यही आता टेन्शनमध्ये आलंय

टेन्शन आता प्रजेलाही आलंय
आपला राजा कोण ठरवावा याचं

आपण चुकलो तर
शिक्षा आपल्यालाच होणार
आणि
‘युवराजा’ला साथ दिली
तरीही शिक्षा आपल्यालाच होणार
याचं टेन्शन प्रजेला आलंय ..

प्रजेनेच आता ‘पण’ करावा …

राजाच्या ‘प्रजातंत्रा’ आड
दडलेली हुकूमशाही झिडकारावी
आणि टाकावं आपलं दान
युवराजाच्या पारड्यात…

एका नव्या राज्यासाठी
आणि टेंशनमुक्त करावं ‘प्रजातंत्र’

: मनीष

Leave a Comment

× How can I help you?