खूप वर्षांपूर्वीची एक गझल ऐकली होती ,
जाहिद शराब पीने दे ….. मे बैठके ,
या वो जगा बता दे जहाँ खुदा ना हो !
अशीच परिस्थिती आता आपल्या,या शहराची आहे . मेट्रोची रस्त्याची ,इमारतींची ,आजूबाजूच्या होर्डिंग लावण्याची, पाईपलाईन गॅस वाल्यांची ,सगळ्यांची काम, खुदाई चालली आहे .
वाहनांची अफाट गर्दी ,रोज ज्याला, त्याला पुढे पोहोचायची घाई असते.त्यामुळे जोरजोरात होणारा हॉर्नचा आवाज सहन होत नाही. वेडी वाकडी येणारी वाहन ,धड कसलेल्या निरोगी तरुण धडक्या माणसाला चालणे अवघड होतं .तर ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बालक त्यांचे किती हाल होत असतील? या खड्ड्यात पडायची भीती नेहमीच वाटत असते थोडा पाऊस आला आणि पाणी साठलं की खाली खड्डा आहे हे समजेल असं होतं दिव्यांगांसाठी सरकार काम करते, पण रस्त्यावरचे हे खड्डे पण बुजवावे.
फुटपाथ तर चोरीलाच गेलेले असतात. फुटपाथ (पदपथ) पादचाऱ्यांसाठी असतात ना! पण ते भाजीवाल्यांनी, फेरीवाल्यांनी, त्यांचे सामान ,त्यांच्या पाट्या, कचराकुंड्या यांनी भरलेले असतात. रस्त्यावरच दुतर्फा मोठी मोठी वाहन पार्क केलेली असतात. कचरा तिथेच ढीग करून,किंवा कधी तसाच, बाजूला पडलेला असतो .
खोदकामाबद्दल बोलत असताना ,हा विषय कुठे मध्येच आला? तुम्हाला वाटेल हे थोडे विषयांतर झाले का?
तर आजचा विषय आहे, खोदणे!खोदकाम करण्याची तर मानसिकताच मला कळत नाही. नवीन खोदकाम करणारे, जुने खोदकाम संपल्यावर, एक दोन दिवसांनी /आठवड्यांनी येतात, ते देखील परत खोदतात.
रस्त्यातल्या काही काही ड्रेनची तुटकी रुप बघा,खड्डे नाले तर कुप्रसिध्द असतात.वारंवार झाकण काढून त्याच्यातून पाणी अथवा घाण साफ करून ,झाकण कधी परत लावली जातात .पण ती परत परत वाकडी होतात.खोदलेले ते खड्डे ,शेवाळतात,तुंबतात.रस्त्यावरचे खड्डे ,बाजूचे फेरीवाल्यांनी लावलेल्या हातगाड्या,शिवाय खेळणी चक्र, म्हणजे ते लहान मुलांना बसवून गोल गोल फिरवतात ते चक्र आणि वाहन यात चालायचे कसे?
जागोजागी अर्धवट उखडलेले रस्ते आहेत .ती सगळी काम, पूल ,ईतर काम आणि सगळे उड्डाणपूल आणि सगळे रस्त्याची, मेट्रोची काम आधी पूर्ण होऊ द्या. नंतर नवीन कामासाठी खोदावे ही नम्र विनंती, मला सर्व भाऊंना करायची आहे .पावसाळा या अंतर्गत वाहतुक खुदाईमुळे असह्य होतो. घाटकोपरचा होर्डिंग कोसळून झालेले ,अकस्मात अघटित मृत्यूची घटना ऐकल्यावर तर कामावर गेलेली घरची लोकं मुलं घरी परतेपर्यंत जीवात जीव नसतो.
सगळीकडेच एका वेळी हे खुदाई काम नको.रस्त्यावर,निदान डॉक्टर कडे जायला तरी चालावे लागते.जीव मुठीत धरुन जावे लागते.पडायची भिती वाटते.तुम्ही सांगा, कोणता रस्ता सुरक्षित आणि सुविधा जनक आहे? कोणते फूटपाथ चोरीला गेलेले नाही? कोणत्या रस्त्यावर खड्डे नाहीत?
कहाँ खुदा नहीं?
Recent Posts
देवांनो ! तुम्ही सुद्धा!…
October 23, 2025
No Comments
पोलिस हुतात्मा दिन
October 21, 2025
No Comments
गोष्ट ॲक्वा लाईन ट्रेनची..
October 21, 2025
No Comments
एकल शिक्षकी शाळा : देशाच्या भविष्यापुढे प्रश्नचिन्ह
October 17, 2025
No Comments
डिएला : अल्बेनियाची पहिली एआय मंत्री
October 15, 2025
No Comments


