*ॲड.वर्षाताई दाटून आला सन्मान.!* (ॲड.वर्षा देशपांडे संयुक्त राष्ट्रसंघ UNO न्यूयाॅर्क पुरस्कार प्राप्त ) *ॲड.वर्षाताई दि.११जुलैला आपणास संयुक्त राष्ट्रसंघ युनोचा अमेरिकेत समारंभ पूर्व सोहळ्यात पुरस्कार प्राप्त होताना दाटून कंठ आला.प्रवाहाच्या विरोधात जाऊन सामाजिक उत्क्रांती घडविणा-या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, मानव मुक्तीचे प्रणेते संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फुले, प्रेरणास्थान माणणा-या गर्भानिदान प्रतिबंध, PNDT pre-conception and pre – Natal Diognostic Techniques (prohibition of sex selection)act,1994. कायद्याची अंमलबजावणी कठोर करा म्हणून तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री एकनाथ गायकवाड यांच्याकडे आग्रह धरणा-या ,गेली पस्तीस वर्षे शासन शोषण व्यवस्थेला कायदेशीर आव्हान देत गाव खेड्यातील लेकीबाळींचा संसार उद्धवस्त करणारी दारूची दुकाने फोडणा-या संघर्षयात्री ॲड.वर्षाताई आपल्या गुणग्राह्यतेला नीळा सलाम.!भारतीय परित्यक्ता ,विधवा, हुंडाबळी,महिलांच्या जीवनात वसंत फुलवणा-या, घराला घरपण देणारी बाई, तीला फक्त भोगदासी बनवू नका.असं आंदोलन करणाऱ्या वर्षाताई,जमीन आणि घराला नव-याऐवजी बाईचं नाव दिलं तर बाई आत्महत्या करणार नाही. माहेरवाशीण सासूरवाशी होताना दीवा भीतीच जीणं जगणार नाही.पूजा म्हाळुंगे,अभिलाषा कोथमिरे, वैष्णवी हागवणे,बळी जाणार नाही.हीन वागणूकी विरूध्द बंडखोर बनेल.प्रतिभाताई पाटील, मृणालताई गोरे, अहिल्या रांगणेकर यांचा आदर्श घेवून राष्ट्रीय एकात्मता जनजागृती अभियान राबविणा-या वर्षाताई जागतिक विचारमंचावरून पुरस्काराला उत्तर देताना महाराष्ट्रात राजकीय साठमारीत मायमराठीची गळचेपी होताना, आपणास इंग्रजी अस्सल येत असताना, हिंदी, कन्नड,जमताना मातृभाषेतून अर्थात मराठीतून बोललात.एवढच नाही तर आपल्याला मिळालेला “World population Day” Award मिळाला सामाजिक प्रश्नासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा हा पुरस्कार, समस्त भारतीयांच्या वतीने जगभर लढणाऱ्या विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वीकारते यातून भावी पिढीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकांच्या हक्कांच्या लढण्याचा,जग घडवण्याचा निर्धार या माध्यमातून होईल अशी अशा व्यक्त करते. एवढं सामाजिक उत्तरदायित्व आपण दाखवलं क्या बात है वर्षाताई .?व्यसनमुक्ती साठी आंदोलन करणाऱ्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व मानव मुक्तीचे प्रणेते संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणास्थानी माणून टोकाचा न्यायीक लढा उभा करणा-या, गर्भातच मुलीला मारणा-यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून सावित्रीची लेक जागतिक पातळीवर मंथन करत्येय आभार ताईसाहेब.!गर्भानिदान प्रसवपुर्व निदान प्रतिबंध इस.सन.१९९४ कायद्याची कठोर अंमलबजावण्यासाठी तीस पस्तीस वर्षे संघर्ष ,मुलींच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या समाजसेविका ॲड.वर्षाताई देशपांडे आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने २०२५ चा “अंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार पुरस्कार” न्यूयॉर्क येथे देण्यात आला. यापूर्वी हा पुरस्कार आयर्नलेडी श्रीमती इंदिरा गांधी व उद्योजक जे.आर.डी. टाटा यांना देण्यात आला आहे. स्त्रीलिंगी चाचणीविरूध्द स्टिंग ऑपरेशन ते प्रबोधन, किशोरवयीन मुलींसाठी कौशल्य विकास स्त्री हक्काचा लढा अजूनही संपला नाही.राजकीय अनास्था, अस्थिरता कारणीभूत आहे. चांगल्याला चांगलं म्हणण्याच औदार्य आणि वाईटावर बोट ठेवत बोलण्याचं धाडस असेल तर परिमाण प्राप्त होत. याच मिक्सर मी संशय अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणून थोडाफार व्यक्त होत आहे. आम्हीही मुलगी वाचवा जनजागृती अभियान सहारा महिला मंडळाच्या वतीने शाळा , महाविद्यालय,आदिवासी भागात ,सौ.शर्मिलाताई सोनवणे,सौ.शालिनीबाई आदमाने ,सौ.जयश्रीबाई भोसले, आशा सेवाभावी महिलांना सोबत घेऊन मुलगी काय मुलगा काय? एकाच नाण्याच्या दोन बाजू समजावताना अंतराळवीर राकेश शर्मा, अन् सुनिता विल्यम्स, कल्पना चावलाची उदाहरणे दिली.सोनावळा ,मोहपाडा, बालविकास,शाळेत राबवले. आपणासही अभिमान वाटेल मराठी असण्याचा.महाराष्ट्रीयन असण्याचा.स्वत:ला जागतिक पातळीवर सिध्द केलेल्या ॲड.वर्षाताई देशपांडे यांच्या गुणग्राह्यतेला सलाम!जाहिर अभिनंदन!! जय संविधान!!! जय भारत.!!!! @* *समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे महाराष्ट्र शासन! जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स, रूग्णहक्क संघर्ष समिती, विशेष कार्यकारी अधिकारी (SEO)+ ९३२४३६६७०९*
Recent Posts
देवांनो ! तुम्ही सुद्धा!…
October 23, 2025
No Comments
पोलिस हुतात्मा दिन
October 21, 2025
No Comments
गोष्ट ॲक्वा लाईन ट्रेनची..
October 21, 2025
No Comments
एकल शिक्षकी शाळा : देशाच्या भविष्यापुढे प्रश्नचिन्ह
October 17, 2025
No Comments
डिएला : अल्बेनियाची पहिली एआय मंत्री
October 15, 2025
No Comments