विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

फ्री स्कूल अंडर द ब्रिज : पुलाखाली भरणारी स्वप्नांची शाळा

दिल्लीच्या यमुना बँक मेट्रो स्टेशन परिसरात, एका पुलाखाली गेली दोन दशके मानवतेची एक वेगळीच शाळा उभी आहे, जिथे शिक्षणाला भिंती नाहीत, पण स्वप्नांना पंख आहेत.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील रहिवासी राजेश कुमार शर्मा, जे व्यवसायाने एक छोटे दुकानदार आहेत, त्यांनी २००६ साली केवळ दोन मुलांपासून एका अद्भुत प्रवासाची सुरुवात केली. स्वतःच्या आयुष्यातील शिक्षणाच्या अभावामुळे आलेल्या अंधाराने त्यांना एक वेगळीच दिशा दिली. त्यांचं एकाच स्वप्न होतं “माझ्यासारखं कोणाचं भविष्य अंधारात राहू नये.”

आज त्याच पुलाखाली भरणारी ‘फ्री स्कूल अंडर द ब्रिज’ ही केवळ शाळा नसून ३०० गरीब मुलांच्या आशेचा किरण बनली आहे. काँक्रीट थंड जमिनीवर पसरलेल्या पथाऱ्या आणि फक्त पाच ब्लॅकबोर्ड हेच त्यांचे वर्गखोले. पण या साध्या साधनांमागे आहे एक असामान्य जिद्द आणि शिक्षणाची अपार तळमळ.

राजेशजींना साथ देण्यासाठी आणखी सात शिक्षक निस्वार्थ भावनेने काम करत आहेत. कुठलीही सरकारी मदत नाही, कुठलीही मोठी देणगी नाही, फक्त समाजासाठी काहीतरी करण्याची खरी भावना.

ही कथा आपल्याला शिकवते की, बदल घडवण्यासाठी भव्य इमारती किंवा मोठे निधी आवश्यक नसतात. आवश्यक असतात ते ठाम निर्धार, संवेदनशील मन आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात उजेड पसरवण्याची खरी इच्छा.

‘शिक्षण हा केवळ अधिकार नाही, तर प्रत्येक मुलाचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी एक माणूसही पुरेसा असतो…’ हा एक मोठा संदेश देते.पुलाखाली सुरू झालेली ही शाळा आज समाजाला देत आहे.

Leave a Comment

और पढ़ें